मी नेहमीची चूक आहे,अर्धपोटी भूक आहे
Stylish असलेल्या गर्दीतला मी खराब लुक आहे
मी उशीर आहे नेहमीच,थांगपत्ता नाही का वापस यायचं
निघतो सुद्धा असाच माहीत नसतं कुठं जायचं
जे जगलोय ते असच,स्वतःच स्वतःवर हसून
जे भोगलोय ते असच,गर्दीत एकटं बसून
आणि तुझ्याकडे पाहतो तर तू १०० पैकी १००
जवळही नाही मी, आणि माझं ६०-७०
तू कशी सर्वोत्तम, मी साधा उत्तम पण नाही
नेहमी सार अर्धचं,विवंचनेत काही राहील तर नाही
तू कशी वेळ ओळखून असतेस,मी वेळेजवळ सुद्धा नाही जात
एक हातचा राखून असतेस,झालेलं आवरायला गेलेले माझे हात
तू कशी सर्वोत्तम, मी साधा उत्तम पण नाही
नेहमी सार अर्धचं,विवंचनेत काही राहील तर नाही
0 Comments