अशी दिसावीस तू समोर,नजर समोर जाताना
आणि हातं नरम पडावीत
अशी चालायला लागावीस, माझ्याकडे बघून
की कानं गरम पडावीत
अशी वाटावी भीतीपण नकाराची तुझ्या
प्रश्न टाकुच नये मी
अशी जावी समोरून तू, जवळून वळून माझ्या
बघण्या वाकूच नये मी
अशी अचानक यावीस पुढे तू,
चौकोन फिरताना सतराचा
अन् मी लपायला जायला बघावं....
असं दुर्लक्ष करावंसं सतरावेळा तू,
की असेल कुणीतरी वरचा
पण मी नजरेत यायला बघावं...
अशा शक्यता निर्माण व्हाव्यात,
सतराशेसाठ माझ्या
पण अंतिम धोरण तू असावं....
असं ऊन अडवुन सावल्या पडाव्यात
सतराच्या खिडकीतून तुझ्या
अन् त्याच कारण तू असाव.....
असं नात असावं तुझं, तू ध्रुवासारखं चकाकावं
मी फिरत रहावं आजूबाजू तुझ्या
असा गोंधळ असावा तुझा,त्यानेच तू चमकावं
लक्ष न द्यावं गिरक्याकडे माझ्या
प्रयत्न करावा तू,अक्षाबाहेर निघण्या
तरी त्याच दृष्टिकोनात तू वेद म्हणून रहावी
गुंतागुंत व्हावी उत्तरांची ओळीत बसण्या
त्यांना सहज करण्या,तू ध्रुवपद म्हणून यावी
असं लिहीत जावं मी,तू यायचिये म्हणून
आणि तू फाडून फेकावी कागदं
असं वाहत यावं मी,उत्तरं मागायचियेत म्हणून
आणि तू करावं त्यांचं लगदं
अशी येताना दिसावीस ,प्रखर होत होत यावीस
नकार कळवून परत निघावंस तू,
अशी जाताना दिसावीस ,धूसर होत होत जावीस
क्षितिजावर वळून का बघावंस तू ?
अशी यावी भुरभुरपण
मती चिखल चिखल व्हावी
खारफुटी होऊन वरकरणी
पायाशी धसती दलदल व्हावी
मग असा यावा पाऊसपण
सगळं धुवून धुवून जावं
पापण्याखाली दबलेल्या आसवांनी
त्यातच ओघळून वाहून घ्यावं
#shh7741
0 Comments