21

जिवंत मड्याशी झाली भेट सकाळी          
मरणातला आनंद सांगत होता तो
जिवंत कसा होता त्याला नव्हतं माहीत
सुधारू वाटलं तर सुधारशील का या वेळी
हातून गेलेल्या संधीबद्दल विचारत होता तो
त्याला झोप कशी लागत असेल मला नाही माहीत

अजूनही मडे जिवंत आहेत बोलला घेऊन येतो 
बोलायला तुला,जुन्या चूका उकरायला तुझ्या
हुकलेल्या संध्या मी लागलो शोधायला खुप उशिरा 
कळलेलं मला चुका आपोआप उकरल्यात मी माझ्या

तो मीच होतो,झेंडा लावून जगत होतो
नाही त्या ठिकाणी,खेटे मारून बघत होतो
पिना मारून घेता घेता,पिना पाडत गेलो
मड्याला घालता पाणी,स्वतःतच सडत गेलो

मयत भुताशी झाली भेट रात्री
जगण्याचा आनंद सांगत होता तो
कसा मेला त्याला नव्हतं माहीत
जमलं तर येऊ का छातीवर नाचायला दरवेळी
सुटलेल्या हर एका गोष्टीवर प्रश्न विचारत होता तो
मला झोप कशी लागली मलाच नाही माहीत

अजूनही आहेत भुतं जमा तुझी बोलला
घेऊन येतो नाचायला ,जुन्या माणसांना माथी मारायला
सुटलेल्या हर एका माणसांचा घेतला मी मागोसा
खूप उशीरा कळल,चालू केलेलं माथी मारून घ्यायला

तो मीच होतो,झेंडा लावून जगत होतो
नाही त्या ठिकाणी,खेटे मारून बघतहोतो
पिना मारून घेता घेता,पिना पाडत गेलो
चितेत जाऊनी तोल,जीव सोडत गेलो

जाग आली,आली दोन चांगली भुतं
मी धावणं सोडून दिलं
माझा भूत सांगणारे
झेंडे रोवन सोडून दिलं
बसायला घेतलं,परत हसायला घेतलं
जमलेल्या मड्यांना एकदाच पेटवायला घेतलं

त्या आलेल्या संधी हुकल्या 
चालेल थोडं कमी म्हणून जगायचंय
ओळखं सांगणारे झेंडे नसतील
आता फक्त मी म्हणून जगायचंय
चितेत गेला तोल तर
जळायचंय पण प्रकाश म्हणून जगायचंय
ओळख सांगणारे झेंडे नसतील
आता फक्त मी म्हणून जगायचंय


मडं-मयत,जिवंत नाही असा


Post a Comment

0 Comments