गोदा....

सांग गोदा सांग माहात्म्य तुझं काय ?
तुला गंगा उगाच म्हणत नाहीत.. 
कुणी मड्याखालचे खांदे म्हणून 
दुखले भोगले नाही जमले पापपुण्याचे सांधे म्हणून तुझ्याकडे उगाच येत नाहीत

कुणी जळत्या चितेवर विसावा म्हणून
त्या हरवलेल्या देहाचा दहावा तेरावा म्हणून 
कुणीतरी येतंच असत, तुला गंगा म्हणून

वाहता येईल तुझ्यासंगे म्हणून पाहता येईल मृत्युपलीकडे म्हणून कुणीतरी देतंच असत, गंगे जीव तुला म्हणून

धुवून निघतील पाप म्हणून कुणी 
की होऊ पूर्ण साफ म्हणून 
कुणीतरी येतंच असते गंगे,
की करशील तू माफ म्हणून

जीव टेकवलाच कधी तीरी तर वाहत घेऊन जा चितेवरची राख बनून, 
तरंगण नकोय मला 
शेवटचा दिवस शेवटचाच असेल,
परत तुझी वाट बघत 
दहाव्या,तेराव्यात झुरण नकोय मला

Post a Comment

0 Comments