चुकली पावलं म्हणून,सुटली कौलं म्हणून
हिशेब नाही जमला म्हणून की अर्ध्यातच दमला म्हणून
झुकलं शीर म्हणून,फेकलं गैर म्हणून
हातची लढाई हरला म्हणून एवढ्यालाच सरला म्हणून
थकलं धड म्हणून,राहशील पड म्हणून
अडली वाट म्हणून की आडवे सतराशे साठ म्हणून
टेकले गुडघे म्हणून,दिसले थडगे म्हणून
एकटा उरला म्हणून की इथवरच आणि इथेच पुरला म्हणून
तू घेतलीस ती वाट..तू दाखवला तुझा थाट
त्या वाटेवर दूत होते,गुंतले सुटले सूत होते
काल मुठी आवळल्या
आज त्याचे मोकळे सुटले हात होते
त्या वाटेवर..यमाशी गाठ होती
भावा ती वाट...मसनवाट होती
#pdw41
0 Comments