आवडत नाही मला..

आजकाल तुझं तस बोलणं आवडत नाही मला
तुझं दुरून चालणंही आवडत नाही मला 
आवडत नाही मला, तुझे प्रश्न तूच सोडवणं
मी सोडवायला गेलो की अडवणं..

तू दुःखात असताना देखील हसतेस
ते तुझं हसणं आवडतं नाही मला 
नाराज होऊन जातेस, एकटं बसतेस 
ते तुझं एकटं बसणंही आवडत नाही मला

तुला वाटलं म्हणून दात दाखवणं, आवडत नाही मला
तुला पटेल तस मला वागवणं, आवडत नाही मला
आवडत नाही मला,तुझं इतकं निवांत असणं 
राक्षसांशी भांडूनही इतकं निखळ हसणं...

तुझ्याशिवाय दुसरं कोणाला सांगणार,पर्याय नसणं तुझ्याशिवाय कुठं रडणार तूच उपाय असणं

पण तू आवडायचं सुटत नाही 
आणि नेमकं हेच आवडत नाही मला ....... 

@shivonkarr

नेमकं काय ? प्रश्न आहेत फक्त

Post a Comment

1 Comments