म्हणजे तुझीचं पुस्तकं काय ती नवीकोरी
प्लास्टिक कव्हर,स्टिकर लावून एकदम बेस्ट
आमची तीच जुनी,परंपरेने आलेली
पेपराचं कव्हर साला जुनी आवृत्ती आणि प्रिंट मिस्टेक
म्हणजे तुझ्याच वह्या रेखीव शुभ्रता फेकलेल्या
सुंदरम,बॉस,क्लासमेट आणि लक्झर
माझ्या पानं सुटलेल्या ,ग्राफने मुंडकी टाकलेल्या
रफ, टू इन वन किंवा रूलिंग पेपर
म्हणजे तुझं अक्षर,पेनावर ठरतं,
दोन,तीन,पाच दहा आणि ट्रायमॅक्सने वेगळं येतं
म्हणजे माझं अक्षर,बोटांवर आहे काय वाटतं
साला पेन बदलून सुध्दा फक्त खराबच येतं
म्हणजे तुझीच उत्तरं काय ती खरी,पूर्ण
नवनीत च्या नव्या आवृत्ती मधली
माझीच उत्तरं चुकीची,अभ्यासक्रम,लेखक,
संदर्भ आणि पुस्तकाशी ताडातोड केलेली
म्हणजे सगळी जणू तुला समजलेली,
वाचलेली,पेपरात आलेली, तू लिहिलेली
म्हणजे माझीच काय ती रटाळ,रेघोट्या
कळलं नाही म्हणून खाडाखोड झालेली
म्हणजे माझंच काय ते चुकीचं नेहमी
म्हणजे तुझंच काय ते बरोबर
म्हणजे माझंच काय ते दोषात सापडलं
तुझंच काय ते विदाऊट एरर
म्हणजे माझंच उत्तरं त्रुटीचं नेहमी
म्हणजे तुझंच काय ते खरंखुरं
म्हणजे माझंच काय ते दोषात सापडलं
तुझंच काय ते विदाऊट एरर
#AMBANB141
7 Comments