वाहत्या वाऱ्यात स्थिर ढग होताना पाहिलंय मी तुला
बोचऱ्या थंडीत, वाढती धग होताना पाहिलंय मी तुला
हा जीव वाळवंटी उभा तहानलेला, मेघ हो तू
ही कापरी थंडी, गोठल्या शिरा, आग हो तू
पेटल्या वणव्यासमोर उभी, वरुणाच रुप घेऊन
उठल्या वादळात नभी, क्रौर पवणाला थोपऊन
हा जीव प्रावरणी, गाभ्यात धसलाय, ज्वाला हो तू
हे अंतराळ हवं आता, बरस जरा प्रिये उल्का हो तू
ही व्यथा व्यर्थ, नुसतीच अलंकाराची गर्दी
ही कथा सार्थ, तिचे मोल पारधी
ह्या अर्थहीन प्रथेची प्रिये आरती हो तू
ह्या दिशाहीन समर्थाची सारथी हो तू
#76
#सहाकारणं #सत्तरसबबी
0 Comments