भास्करा.....
तुझा प्रकाश अभिमान असायचा माझा
पण तू ढग धरलेस, आडोसा घेतलास
तसं मला तरी वाटलं किमान
आणि मी अंधाराची सवय करून घेतली
मला सवयीची होती तुझी एकाधिकार सत्ता
मी तुला नेहमीच स्वीकारल होतं
विझत्या दिव्याला विचारला तुझा पत्ता
ज्यांनी तुझ जळणं अंगिकारल होतं
मी पायऱ्यांवर आंधळा धावत होतो
प्रत्येक वळणावर दिवे लावत होतो
आणि त्या दिवशी तो ढग बाजूला गेला
मी पाहिलं तुझा आडोसा बाजूला झाला
अशा एक दोन आडोशाला आता मी मोजत नसतो
लाख विझतात दिवे भास्कर कधीच विझत नसतो
#be_the_Bhaskar🌥️🌤️☀️
3 Comments
प्रत्येक वळणावर दिवे लावत होतो
This hits hard mann🤧⚡
ज्यांनी तुझ जळणं अंगिकारल होता..