लहान होतो तेव्हा मोठं व्हायचं खूळ घुसलं होत...
आईची कूस सुटली सगळं तेव्हाच फिस्कटल होत....
कमवायला निघालो आम्ही, साऱ्या जगाची दौलत
माहीत नव्हतं आम्ही काय काय गमावलं होत
आईने कंबरेवरच खाली उतरवून चालायला लावलं
बापाने खांद्यावरनं जत्रा फिरवायचं बंद केलं
आज्याला हातावर रुपया द्यायला कसतरी वाटलं
आजीकडं पैसं मागताना मागून शरमेचं भूत आलं
गुडघे फुटणं, बोटं सोलणं बंद झालं तेव्हा
वाळूत खोपे काढणं बंद केलं तेव्हा
कमावती माणसं, कमावता पैसे बघून
मनमर्जीने जगता येत असेल वाटलं होतं
आम्ही ज्या मोकळ्या पंखानी स्वप्नं बघितलं उडायचं
आमचं आभाळ सारं तिथंच फाटलं होत
कमवायला निघालो साऱ्या जगाची दौलत
मला माहित नव्हतं मी काय काय गमावलं होतं
1 Comments