अनोळखी माणसांची ओळख झाली ना...
की असलेल्या रेषा खोडल्या जातात आणि
तेव्हा कुठे नात्यात स्वातंत्र्य असत !
म ते कोणत्या प्रकारे का असेना दूर जवळ
जागा असते भरपुर पण संशयाला घर नसत !!!!
पण सवय झालीये आपल्याला रेषा ओढायची.
आणि आता अस वागायचं हा अस ठरवतो आपण
पण संशय येऊ नये म्हणून आखलेल्या रेषा
थोडं म्हणून स्वातंत्र्यासाठी पार करतो आपण
आणि बस स्वतः नियमात बसण्यासाठी आखलेल्या रेषा करकच्च आवळायला लागतात !!
आणि no misunderstanding हा म्हणत तयार केलेलं घरटं त्याची उंची ढाळायला लागत
काहीशा अशाच असतात रेषा ...
बोलता बोलता propose करणार नाही ना हा
म्हणून कधीकधी खेचल्या जातात
पण समोरचा नव्हता तसा...मर्जीच्या पूढे जाणारा
तरीपण त्याच्यावर रेषा आवळल्या जातात
फक्त secure राहण्यासाठी तू बाकीच्यांशी वागायचं कस हे सुद्धा आपण पार्टनर वर थोपवुन देतो
आणि आपलं काय आपण नाही आहोत तसे म्हणून आपल्या स्वतंत्रते वर झोकवून देतो
स्वतःवर ठेवला तेवढा विश्वास पार्टनर वर नाही ठेवू शकत म्हणून या रेषा कामी येतात
कधीकधी एखाद्याच्या प्रेम व्यक्त करण्याआधी त्याला त्या नात्यात रेषा बांधून ठेवतात
बस कधीकधी तस काही मनात असताना चांगलं नात तोडून सुद्धा रेषा जातात
Maths मध्ये म्हणतात अखंड असतात रेषा .....
पण इथं कधी प्रेम तर कधी मित्र मैत्रिणी तर कधी भाऊ बहिणीच्या नात्याला खंड पाडून जातात !!
सरळ घुसतात रेषा कारण त्या फक्त एकदिशी असतात.....
त्यांना फक्त माप माहीत असत limit नाही
त्यांना फक्त जगायचं माहीत असत वागायचं नाही!
@shiv4641
#नात्यातल्या_रेषा
12 Comments
काहीच क्षणात त्याच्या आयुष्याची ZigZag रेषा सरळ होते...
खूप छान लिहिलं आहेस मित्रा.....