आपण परत बोललो,खूप महिन्यानंतर
वर्ष गेल्या सारख वाटत होतं ।
वाटलं भडभड बोलून टाकाव,
या तीन चार महिन्यात सारख साठत होत ।।
पण ते साधं हसन,
सामान्य असल्याची जाणीव झाली ।
दोन शब्द बोललो,
साला वाक्य पण नवीन आली ।।
म्हणून पावलं आवरली दोघांनी,नम्र वागलो अगदी ।
हसलो फक्त नवख्या सारख,अनोळखी वागतात तशी ।।
तुला माहितीये ते रस्ते
तू या आणि मी त्या बाजूला चालत असायचो ।
आणि tuition चे किस्से
लवकर सुटलं तर तू,उशिरा सुटलं तर मी नसायचो।।
म्हटलं आठवून द्यावं,
खिडकीतून आवरलेल्या आठवणी ।
साला साठवून ठेवावं
बोर्डाच्या सावरलेल्या साठवणी ।।
पण थांब जरा म्हणत,वाक्यं दाबली काहीशी
हसलो फक्त नवख्या सारख,अगदी अनोळखी वागतात तशी ।।
तो विज्ञानाचा फोडलेला पेपर,
तुला पडलेले मार्क अडतीस ।।
आहेत ती सर्व कागद,पण साला
अक्षरासोबत असतील कुठे अडगळीस ।।
म्हणलं चालत जावं पुन्हा
पाठक, नरहरे करत दयानंद clg कडे ।
वापस धरावा रस्ता जुना
आणि धावतच जावं पाऊल नेतील तिकडे ।।
गर्दी होत होती म्हणून डोकं शांत केलं,जाग्यावर आलो अगदी ।
चल भेटू म्हणत आपापली वाट धरली,अनोळखी धरतात तशी ।।
पुन्हा नाय तिथंच जायचं,म्हणत तुझे आहेत तेवढे साभार ।
परत नाय उजेड पाहायचा अनुभवायला अजून जुना अंधार...।।।।
@shiv4641
Follow करायला विसरू नका.....😁😊
#जुनी_अडगळ
32 Comments