नाही तुझा मित्र

खूप दिवसआधीच लिखाण....पोस्ट करू का नको या दुविधेत आणि इतर बऱ्याच कारणांमुळे तसच पडून होत..शब्द सापडले आणि आज केलं पोस्ट😁

      


उद्या तुझा वाढदिवस...
गुरुवारीच होता वाटत,विसरलो मी
पार्टी घ्यायला आवडते हो मला
पण तुझं तू साजरं कर, कारण मी


कारण मी लांब उगाच चालत जाईल
जेणेकरून तुला ठीक अंतर राखता येईल
आम्ही मित्र आहोत रे...
माहीत असून सर्वांना सांगायला होईल

तर
फोन ठेव आधी,कॉल नको करू तू
व्यस्त सांगेल,block आहेस,नको विसरू तू

क्षमस्व,निष्काळजी आहे मी जर वाटतय हे टुकार
नाही होऊ द्यायचं हे मला अजून बेक्कार
ठरवलंय फक्त मी,बदलली वेळ बदलली जरी सत्र
सोड ना बदलाचं आता,मी नाही तुझा मित्र
व्यवहार झाला आणि गैरसमजाला दिलीस सूट
बोलणं बंद आहे,गप्प रहा,कर स्वतःची समजूत
ठरवलंय फक्त मी,बदलली वेळ बदलली जरी सत्र
सोड ना बदलाचं आता,मी नाही तुझा मित्र

ठीक असशील वाटतय..
फिकीर नाही करायची,सारे तुला सांगतील
मी गप असेल फक्त
जर या वेळेस काही अडचण घेऊन येशील

घेऊन येशील,आणि दुर्लक्ष काय असत सांगेल मी
अदृश्य होईल,तयारी ठेव,जरा वेगळा वागेल मी 
मी चालत जाईल ग....
पण मैत्रीतल अंतर पावलांनी चांगलंच कापेल मी

म्हणून 
लिहितेस तर थांब जरा..dp दिसतोय का बघ आधी
Block आहेस ग...एकच tick येईल साधी

म्हणून क्षमस्व,निष्काळजी आहे जर वाटतय टुकार
फक्त होऊ द्यायचं नाही,नव्हतं अजून बेक्कार
म्हणून ठरवलंय, बदलली वेळ बदलली जरी सत्र
सोड ना बदलाचं आता,मी नाही तुझा मित्र
व्यवहार झाला आणि गैरसमजाला दिलीस सूट
बोलणं बंद आहे,गप्प रहा,कर स्वतःची समजूत
ठरवलंय फक्त मी,बदलली वेळ बदलली जरी सत्र
सोड ना बदलाचं आता,मी नाही तुझा मित्र

जमा आहेत गुपितं,अजून असतील काही
सांगायची कशी आणि कोणाला
गुपित आणि मित्र नवीन पण असतील काही
दुविधेत असशील आणि सांगशील मला

सांगशील मला,पण वाटत नाही ऐकू येतील शब्द
सांगून समाधान झालं,की उठुन जाईल फक्त
मजपाशी सांगण्यासारखं काहीच नाहीये ग
काही होत नाही म्हणणारे म्हणून होतात अशक्त

म्हणून,
काही विचारतेयस अजून, तर उत्तर स्तब्ध असतील
तुझ्या प्रश्नांना प्रश्न पडेल असे शब्द तोंडून निघतील 

क्षमस्व,निष्काळजी आहे मी जर वाटतय हे टुकार
नाही होऊ द्यायचं हे मला अजून बेक्कार
ठरवलंय फक्त मी,बदलली वेळ बदलली जरी सत्र
सोड ना बदलाचं आता,मी नाही तुझा मित्र
व्यवहार झाला आणि गैरसमजाला दिलीस सूट
बोलणं बंद आहे,गप्प रहा,कर स्वतःची समजूत
ठरवलंय फक्त मी,बदलली वेळ बदलली जरी सत्र
सोड ना बदलाचं आता,मी नाही तुझा मित्र

आणि खरच धन्यवाद..सोबत होतो मैत्री शिकलो मी
आयुष्य घालवत होतो,गतीची खात्री शिकलो मी
आभाराचे चार शब्द फक्त..बाकी सगळं तसच आहे 
माणसं आणि सवयी बदलतात..हे सारं असच आहे

आभार ऐकून,कॉल साठी मोबाईल घेशील
वाईट वाटतय,म्हणून कॉल करशील
तर थांब,
फोन ठेव आधी,कॉल नको करू तू
व्यस्त सांगेल,block आहेस नको विसरू तू

बोलायचं कशाला,कोणाला..वाटेल ते लिहिण
सोड ना प्रश्नउत्तरांचं,नाहीसच माझी मैत्रीण
सुचेल तर उतरवेल,शब्दांची वाट पाहीन
काहीच नको सांगायला,नाहीसच माझी मैत्रीण...






Post a Comment

12 Comments

Akshu said…
☺️🔥 विसरून पु ढे चला......
Unknown said…
𝓝𝓲𝓬𝓮
Mahya said…
Bhava thodi mistek ahe
shivonkar said…
धन्यवाद
shivonkar said…
धन्यवाद
shivonkar said…
धन्यवाद