लहानपण खूप भारी होत यार....
साला भांडण व्हायची कट्टी बोलून.....
आणि गट्टी पण व्हायची अशी
जस काय भांडण कधी झालीच नव्हती
लहानपण खूप भारी होत यार...
आई शाळेत पाठवायची खोबऱ्याच तेल लावून
आणि जेल लावल्यागत केसं व्हायची अशी
नको वाटायचं पण आईला त्याची चिंता नव्हती
खायला कसली लाज म्हणत एक डब्बा चार हात,
मसाला पुडी,भली मोठी रांग आणि शाळेचा भात
पळायच ठरलं टाकली दप्तर,अन भिंतीवरून उड्या
मास्तर पुढं, आज खैर नाही म्हणत निसत्या छड्या
लहानपण खूप भारी होत यार...
बाप कामावर जायचा हातावर चिल्लर ठेवून
आणि हसणं पण killer यायच असं
कमी पडतील पैसे,तक्रार कधी झालीच नव्हती
1 रुपयाला चार इमल्या,1 चे लिमेलट
भरला खिसा,एक इमली तोंडात,स्वर्गच थेट
धरायचो शर्टात दाताने,लिमलेट चे तुकडे चार
तोंडसोबत हृदय पण गोड,असे जिगरी यार
लहानपण खूप भारी होत यार..
कांड करून कलटी व्हायचो
पण हातपायाची सालटी निघायची अशी
आजकाल तसली दुखणीच नाहीत कधी...
बेंचेसला ढोल म्हणत नाशिकचा ठेका वाजवणारे
मॉनिटर ला खाऊ घालून नाव नको लिहू म्हणणारे
नाव सगळ्यांची आहेत पण चेहरे अशे बदललेत
काहीजण शिकतायेत काही कामाला चिकटलेत
लहानपण खूप भारी होत यार
छोटछोट्या गोष्टी यायच्या आनंद निर्मळ घेऊन
आणि रडायचो पण अस निमताळं होऊन
आनंद अन दुःखाची क्षण फरक च पाडत नव्हती
मोठं झालं की स्वातंत्र्य फक्त,वाटायचं नुसतं
दुनियादारी झुकवते कोण सांगतच नव्हतं
पैसे हातात आल्यास मज्जा फक्त,वाटायचं नुसत
जबाबदारी वाकवते कोण सांगतच नव्हतं
आजकाल फक्त विचार येतो,मस्त होत लहानपण
कसलाही स्वार्थ नव्हता ना कसलं मीपण
हरवलोय वाटत असेल ना,फक्त सांगायच स्वतःला..
मोठं झालोय जरी,सोडायच नाही लहानपण
@shiv4641
#सुटलेली_क्षण
22 Comments