काही दोस्त आहेत,आम्ही आहोत ना
म्हणून रडू देणार नाहीत
दुनिया इकडची तिकडं जाईल
पण हे नुमने कधी एकटं पडू देणार नाहीत
शब्दांमागे अपमान करतील,मिळून उडवतील
चांगलं बोलतील कधी,तेव्हा हरभऱ्यावर चढवतील
भावा तुझ्याकडेच बघतेय रे...म्हणून ढकलतील
आणि ढकलून हे मागच्या मागे पसार होतील
काम असो,कांड असो हे आपल्या सोबतच असतील
मोक्याच्या वेळी पळून जातील,दात काढून हसतील
घरच्यांसमोर सभ्य होतील,स्वतःची प्रतिमा आवरतील
वेळ येईल तेव्हा आपलं सार कांड हेच नमुने सावरतील
संकट येतील,नाहीतर हे आणून देतील
आणि एकटं नडु देणार नाहीत
दुनिया इकडची तिकडं जाईल
पण हे नमुने कधी एकटं पडू देणार नाहीत
तू नाहीस तर मी कशाला,म्हणून lecture मधून बाहेर येतील
आता तू शिकवशील बापाला,म्हणून ज्ञानाचा आहेर देतील
वही दुसऱ्यांची मागतील...सही दुसऱ्यांना सांगतील
इंस्टा ला mention करतील,काहीतरी सांगून tension देतील
समस्या नसल्या तरी गप बसणार नाहीत उगाच काड्या करतील
भावा घोळ झालाय रे,आता कस म्हणत नंतर उड्या मारतील
चांगलं होऊ,वाईट होऊ
पण कधी अंतर सोडू देणार नाहीत
दुनिया इकडची तिकडं जाईल
पण हे नमुने कधी एकटं पडू देणार नाहीत
आयुष्याचं सत्र... विषय माझे मित्र
जिंदगाणी च्या गणिताचे हेच सारे सूत्र
संकटांची दुकानदारी...मित्र माझे उधारी
बिघडलेल्या प्रश्नांचे हे बिनपगारी अधिकारी,
समस्यांची फरफट..त्यात ह्यांची दररोजची वटवट
उपाय नाही म्हणून सवय झालेली नेहमीची कटकट
अंतर असेल तर रस्त्यांचंच असेल,ते मनातलं होऊ देणार नाहीत
जा चल निघ! बोलतील पण इतक्या सहज जाऊ देणार नाहीत
संवाद तुटला की नात तुटलं अस कधी घडूच देणार नाहीत
देवाशपथ सांगतो...दुनिया इकडची तिकडं जाईल
पण हे नमुने कधी एकटं पडूच देणार नाहीत
#आम्ही_आहोत_ना
visit blog and share if you want
30 Comments