ओझं बनून राहिलेला प्रश्न
त्याला अजून वाढवणारं उत्तर
त्याच प्रश्नोत्तरांनी भरलेल्या वह्या
अन् जड होत जाणार दप्तर...बोलणं पटेल की वाईट वाटेल
मुद्दे लक्षात घेतील का ?
भावनेत जातील की शहाणे म्हणून येतील
त्याच अक्षात राहतील का ?
आणि म्हणून ओझं वाढतच आहे
नव्याकोऱ्या प्रश्नांचं
चारी बाजू,दररोज पडतच आहे
घाव उपऱ्या घनांचं.
माझ्या ठरवून ठेवलेल्या ओळी
ऐकून घेता तिने आणलेली खळी
बोबडी वळून बदलेलले शब्द
अन् त्या खळीसाठी मी स्तब्ध ।।१।।
उत्तर मिळवायला केलेला पाठलाग
नजर चुकवून,नजरेत यायला दिलेली हाक
चालून चालून थकलेली पावलं
अन् निराश होऊन धरलेला बाक
पावलं ओळखेल आणि कारण विचारेल
नात तर मोडणार नाही ना ?
बोबडी वळेल पण ती ऐकेल
आणि ओळी तर खोडणार नाही ना ?
म्हणत आणि ठरवत ओझं वाढत जावं
चुकत जावं पावलांनी
एक पडावं आणि मागोमाग पडत जावं
स्वाभिमानाच्या कौलांनी
वेळेसाठी ठरवून ठेवलेल्या ओळी
ऐकून घेताना तिने आणलेली खळी
बोबडी वळून माझे बदललेले शब्द
अन् त्या एका खळीसाठी मी स्तब्ध ।। २ ।।
दररोजची ठरलेली पळापळ
आणि ठरलेली ठिकाणं
अचानक आलेली टाळाटाळ
आणि निराश होऊन जाणं
वागणं समजेल की प्रश्न पडेल
नाराजीचे सूर नको.
नात्यातील कोणी परत नडेल
पुन्हा गर्द काहूर नको.
म्हणून ओझं वाढतंच गेलंय
गडबड अन् नकाराच्या स्थितीने
मोडलय आणि मोडतच गेलंय
नात्यांतील अकरांच्या स्थितीने
माझ्या लिहून ठेवलेल्या ओळी,
ऐकून घेताना तिने आणलेली खळी
बोबडी वळून बदललेले माझे शब्द
अन् खळीसाठी मी जागेवर स्तब्ध ।।३।।
बस म्हणलं स्वतःला अन् उचलुन पावलांना
भीती लोटली दूर
थांब म्हणलं तिला,अन् जमवुन ओळींना
प्रश्न टाकला समोर
ठरलेली खळ, या वेळी काही आलीच नाही
अन् पाठ केलेली ओळ,तशीच राहिली पडून
वेळ आली,काळ आला,खळी आलीच नाही
खळीची सवय असणारा,बसलो तिथंच अडून
जादू खळीची होती रे,चेहऱ्यात नव्हतंच काही
मज्जा ओळींची होती रे,शब्दात नव्हतंच काही
खळी हसल्यास येते,खोट्या चेहऱ्यात कष्ट हाय
स्तब्ध उगाच नसायचास,समजून जायची गोष्ट हाय ।।धृ।।
Here are your words भावा..thanks later😁
समजून जायची गोष्ट हाय🖤🤞
#P(S)3J2
14 Comments