हे माझ्या त्या मित्र मैत्रिणींसाठी....कळत्या वयापासून जे काही काळ सोबत होते,ज्यांच्यासोबत माझा काही मस्त वेळ होता.. पुढे काहीजणांच्या वैयक्तिक कारणांमुळे,अंतरामुळे,गैरसमजुतीमुळे ते सुटत गेले .....त्यातल्या काही इथे !!आणि हो दुःख फक्त प्रेम हरवलेल्या माणसांना होत अस समजणाऱ्या पासून कधी त्यांचे मित्र तुटले नसतील....कारण मित्र तुटन अधिक लागत !!!!
Hope it reaches to you
पहिल्या Hiii पासून ते शेवटच्या byye पर्यंत
आवडीच्या 'होय' पासून ते नावडत्या 'नाय' पर्यंत
लास्ट seen दिसायचं तिथंपासून
ते आजवर dp नाही दिसावी इथवर
Msg करून येणारा प्रत्येक knock
आणि कारणं देऊन ठरवून केलेला block....
सोबत सोबत आणि सारखं पासून ते स्वतःची वेगळी वाट
मस्त चाललंय हा जहाज म्हणत वेगळी करून गेलेली लाट
शेवटचा हात दिला ते आठवतंय फक्त
मर्जीने की कर्तव्याने ते आठवत नाहीये
पुस्तक पूर्ण वाचावं म्हणून वाचून काढलस सर्व
अर्धाच होतो मी,तूम्ही होता बाकीच अर्ध
जोक ला पडणारी टाळी ते हरवत गेलेला बॉण्ड
हसत पार पाडलेले आणि रडून कबूल केलेलं कांड
सर्वात सर्वोत्तम पासून ते अर्ध आणि रिकामं
वरवरची काळजी दाखवत खोलवर केलेली जखम
डोळ्यात पाहून सार ओळखणं
ते डोळे भरून भारावून निघून जाणं
भरपूर काही पाहिलंय आजूबाजू वर आणि खाली
ती वेळ परत नको तशीच दाबून ठेवली कर्जाखाली
भरपूर काही पाहिलंय...इथून ते तिथवर
खूप मागे वळुन पाहिलंय..आता नको फिकर
दारावरची टकटक ऐकून येणारी जाग ते मोडलेल भयंकर स्वप्न
फक्त एकदा वळून बघ...बघ किती दूर आलोय फक्त
सर्व काही अनुभवलय...लाटा आणि धो धो पावसात
आठवतंय सोबत चालायचो आज धापा पावलं मोजतात
अशात मस्त झोप येते आणि परत तेच......
दारावरची टकटक,धाडकन जाग आलेलं भयंकर स्वप्न
पण एकदा मागे वळून बघ...बघ किती दूर आलोय फक्त
#मित्र_अनोळखी_झाले
30 Comments
Zakkass ❤️😘😘😘