जरा थांब

कोणावरतरी क्रश असणं मुळातच न सुटलेला प्रश्न असतो आणि नंतर तिचा आपल्याला नकार येणे आता पुढे काय होईल या विचारात आपण अजून पिचत जाणे आणि तरी ती व्यक्ती आहे त्याच साच्यात राहून बोलत राहणे...मग खरा प्रश्न पडतो, जमतं तरी कसं रे हिला ?
जाणती वाट चुकलेला 
मी नेहमीचा न्यून ग
तू हसली अन् ठिकाणाला पावलं लागली गेली
प्रश्नांच्या भेगांनी कोरलेला
मी अगदीच शून्य ग
तू हसली अन् भेगांना कौलं लागली गेली

स्पर्धेत एकटाच तरी हरलेला
मी एवढा बावळट ग
तू हसली अन् आपोआप जिंकलो गेलो
नजरेत अडकेल म्हणून पिचलेला
मी दरवेळी नेभळट ग
तू हसली अन् अचानक वरती फेकलो गेलो

स्वतःच्याच सावलीसमोर गुडघे टेकलेला
मी एवढा घाबरट ग
तू हसली अन् दोन हात करायला शिकलो
भिजलेल्या उंदरासारखा कोपऱ्यात बसलेला
मी एवढा भेदरट ग
तू हसली अन् जाग्यावर मात करायला शिकलो

कधी पाहिलाच नाही चेहरा तुझा रडलेला
कशी एवढी भारी तू
तू हसली की अर्ध दुःख तर तिथंच जात गळून 
कधी पाहिलाच नाही चेहरा तुझा पडलेला
बडबड एवढी जशी खारी तू
आणि त्यावर हसली की ताण जातो पळून

पण तुझं नाही ऐकून मी हातची लढाई हरलो
वाटलं तुझं हसणं सुटेल
तरीही हसलीस आणि मी नकार विसरून घेतला 
एवढं होऊन सुद्धा तू बोलु लागली पण मी गप बसलो
वाटलं तुला काय वाटेल
त्यात काय एवढं म्हणलीस अन् मी मन आवरून घेतलं

कशी एवढी मनाने निर्मळ तू
किमान हे गुपित तरी सांग
की तू एकटीच तग धरलेलं कमळ
आणि मी शापित ते तरी सांग

जरा अजून थोडं थांबशील का ग
एकदा परत शेजारी बसशील का 
हे काही नवे प्रश्न आहेत ग 
सोडवायचे आहेत मला एकदा हसशील का ?

#जरा_थांब




Post a Comment

7 Comments