कधीतरी पाठीवर वेताळाच ओझं येऊन
तुझी पाठ पिचावी.
तुझीपण सावली भयानक व्हावी प्रश्न विचारून
तुलापण गहन कोड्यात टाकावी..
कधीतरी तुझ्या पण शंका याव्यात राक्षस होऊन
तुझं सोनेरी स्वप्न तुटावं.
तू पण एकटी पडावीस गर्दीत अन्
तुला तुझं एकटेपण खेटावं..
कधीतरी तुला पण एकटं सोडावं लोकांनी
अन् स्वतःची वाट धुंडाळावी.
आयुष्याची दिलेली वचनं तोडून जखम द्यावी
आणि ती खोलवर जावी..
माझ्यासारख कधीतरी तुझ्या पण भितीचं विष व्हावं
धमन्यात तुझं रक्त गोठावं.
श्वास घ्यावास तू पण आकांताने ठोके हळू यावे
अन् हृदय कोरड पडावं..
कधीतरी न सांगता तुझ्याशिही कोणीतरी धरावा अबोला
तुझी बडबड अडावी
तुझा पण तोल जावा अनोळखी अंधाऱ्या वाटेला
हात न द्यावा..अन् तू पण पडावी
अशा अनोळखी वाटेवर..निरर्थक प्रश्नांसोबत
कधीतरी तुझा पण प्रवास व्हावा..
माफ कर वेगळं वाटेल...पण देव करो
तुला पण हाच त्रास व्हावा
आसवं असावीत डोळ्यात अन् हक्काचा माणूस म्हणून
तुलाही कोणी विश्वास द्यावा
अर्धी व्हावीत गाऱ्हाणी अन् तो जावा एकटं टाकून
देव करो...मी सहन केला अगदी तसाच तुलापन त्रास व्हावा
कधीतरी तुझे पण अश्रू यावे ओघळून,रडावीस हुंदके देऊन
अन् दिसावं तुला जग
तू पण मदत मागावी विव्हळून..अन् सांगावं तुला नकार देऊन
तुझं तुझं तू बघ
बॉण्ड येड्या बॉण्ड म्हणत कधीतरी कोणी
तुझापण खास व्हावा...
पर्मनंट आणि टेम्पररी फरक सांगून निघून जावा
अगदी माझ्यासारखाच त्रास व्हावा...
सोड...
ईच्छा करतो प्रदूषित नात्यात तू नेहमीच
मोकळा श्वास घ्यावा
पण कळायला हवं तुला...देव करो
कधीतरी तुला पण त्रास व्हावा
देव करो कधीतरी तुला पण त्रास व्हावा
#R55
0 Comments