रात्र 11 ते 1.मन घेरणारी वेळ.दिवसभरातील घडलेलं अस डोळ्यासमोरून जाण्याची वेळ,एखाद्या ठिकाणी हरलेलो आपण हे केलं असत तर वेगळं चित्र असत ही दाखवणारी वेळ,एखादा क्षण खूप जगलेलो आठवून मनातल्या मनात हसण्याची वेळ,इथवरच आयुष्य सुंदर करणाऱ्या व्यक्ती आठवण्याची वेळ,आयुष्य झंड करणाऱ्या व्यक्ती निघून का जात नाहीत यार म्हणत त्यांना आठवण्याची वेळ,काहीतरी जुनं आठवून कसलं बालिश होतो आपण म्हणत लाज वाटण्याची वेळ,कोण्या एका ठिकाणी आपला निर्णय बरोबर लागून कौतुक कसलं भारी झालेलं आठवण्याची वेळ,शाळेत कुठेतरी आपल्याला आवडणाऱ्या पोरीसमोर इज्जत गेलेली म्हणत खाजिल व्हायची वेळ, कधीतरी त्या पोरीसमोर आपली हवा पण झालेली आठवण्याची वेळ,कुठेतरी स्वतःच्या चारित्र्य च्या बाहेर वागलेलो आठवून स्वतःला अपराधी घोषित करण्याची वेळ,दिवसभरात कोण किती आणि कसं चुकलं हे स्वतःला सांगून सार जग माझ्यासारख चांगलं का होत नाही हे विचारण्याची वेळ,आवडत्या माणसाचा msg आला की पडलेलं काम सोडून तिथे रिप्लाय द्यायला जायची वेळ,किंवा दररोज बोर करणाऱ्या माणसाचा msg नोटिफिकेशन पॅनल मधेच वाचून ignore करण्याची वेळ,मर्यादेच्या बाहेरची उघड डोळ्यांनी स्वप्न बघण्याची वेळ मग त्यात काहीही येत , कधीकधी हातात मोबाईल नसल्यास घरच्या भिंतीवर बाहेरच्या झाडाची सावलीचा बघत त्यातून काहीतरी बसतय का बघण्याची वेळ,हे सर्व आठवत असताना आज काही विसरलो तर नाही ना म्हणत असतो आणि अस काही आठवत जे आठवू वाटत नसत आणि परत तोच प्रवास चालू होतं आणि परत असंख्य पडणाऱ्या प्रश्नात भरकटतो..
या सर्वांत हातात मोबाईल असेल,आवडती गाणी असतील तर बस म दोन गोष्टी होतात एक तर त्या गाण्याच्या ओळी स्वतःच्या आयुष्यात कशा तंतोतंत बसतात हे स्वतःला सांगणं आणि दुसरी म्हणजे गाणं फक्त मागे चालू ठेवून vibes घेणं आणि आपले आहेत ते जग बदलण्याचे विचार करत राहणं.....
पण या साठी तुम्ही एकटे हवे..नात्यात असलेले त्यांना माणुसं, बॉण्ड,vibes सर्वांचा स्त्रोत एकच असतो.एकटं असलं आणि हे सर्व घडण्याइतकी जिंदगी झंड असली की आपोआप विचार येतात...
आणि म सर्व ठीक चालू असताना परत एकदा आयुष्यात एखादी खेद वाटणारी गोष्ट येते आणि म परत विचारचक्र आणि प्रवास चालू.त्यात एक गोष्ट नक्की असते...ती म्हणजे
“तेव्हाच बोलून टाकायला पाहिजे होत यार”
मग एखादं संथ शांत गाणं लागतं आणि आपल्यासोबत आपले जग बदलायचे विचार,खेद,आनंद,हसू,रडू ,राग,प्रेम ही सगळी कोशिंबीर एक होते... झोप घेरायला लागते आणि कधी झोप लागते ते पण कळत नाही..
पुन्हा नवीन सकाळ आणि आज रात्री आठवायला पण काहीतरी करावं लागेल ना म्हणत आम्ही बाहेर नाहीतर झोप कशी लागेल ?
Follow for more,click👉👉 THE4641
11 Comments