हलकं धुकं पसरून,नजर फिकी पडावी
चित्र दिसावीत अन् व्यक्ती ओळखीची असावी
तोवर 'राक्षस' साऱ्या जगासमोर आला असावा
ओळखावं सर्वांनी पण राक्षसाशी कोण बोलणार
व्यक्ती तसाच निघून जावा
कोणीतरी यावं,दुनियादारी शिकवावी
जाताजाता घाव मारावा,फांदी कलम करावी
अजून कोणीतरी यावं,शोधून खपली उकलावी
अरे मी आहे ना म्हणत त्यानेच,सहानुभूती जमवून
ती जागा मलम करावी
ओळख सांगणारी पानं, लेबल लावून पाडावी
व्यक्तिमत्व असच हवंय म्हणून सालं ओरबाडावी
निरस झालं तरी थोडं सावरायचा प्रयत्न करावा
जमुच देणार नाय मी म्हणत शेवटचं पान पाडायला
कोणीतरी शिशिर बनून दारात यावा
तू नकोस हरु फक्त,ही तुझी सळसळ
लावलेली लेबलं पाडणार,हे तुझ्या धडाच रक्षण हाय
हा शरद,हेमंत अन् ही पानगळ
पुढं मोठा शिशिर येणार, हेच येणाऱ्या वसंताच लक्षण हाय
येणार पुन्हा नवी कोरी पालवी येणार
अन् येणार लेबल लावणारी जमात
पुन्हा नकोय अजून कलम केलेल्या फांद्या
म्हणून व्यक्तिमत्वाची उंची वाढवायची जोमात
अजून काही असेच ब्लॉग क्लिक👉👉The4641
#D4M7D
#spring
#वसंत
#शिशिर
#fallendshere
8 Comments