समाजाने सुंदर म्हणून जे काही लिहून ठेवलंय त्यात नसणारे,त्या ठरवून दिलेल्या परिमाणात न बसणारे म्हणजे सुंदर नसतात अस मुळीच नसत...तुमचा रंग,वजन,उंची यांच्यामुळे समाज काय म्हणतो फरक पडत नसतो फरक तेव्हा पडतो जेव्हा तुम्ही स्वतः ठरवता की तुम्ही सुंदर नाहीत आणि बस्स म मुखवटा लावून फिरायला मोकळे.तुम्हाला कोणीतरी हवा असतो बोलायला सगळं सांगायला पण तुमचा न्यूनगंड तिथवर पोहचू देत नाही...त्या सर्वांना एकच सांगणं तुम्ही सुंदर मनाने आहात तर समाज काय म्हणतो फिकर करणं सोडून द्या...फक्त शोधायला चालू करा आजूबाजू उत्तरं आपोआप सापडतील ! आणि तुम्ही कसेही असाल बुटके,उंच,काळे,गोरे,सावळे,जाड,हडकूडे जर आपल्या vibes match झाल्या ना तर बस्स तुम्ही माझे मित्र आहात ! दुनिया काय म्हणेल याचा विचार मी नाही करत !
खाली चार कडव्यात चार वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्यात तुम्ही कोण आहात बघा.....
हसरा चेहरा, हात खिशात, आवडती गाणी वाजवत
याच्यासोबत सावल्या पण अगदी स्वरात दिसतात
दुनिया काय म्हणेल म्हणून अश्रू तिथेच दबतात
ते पण कधीतरी याला एकटं पाहून घेरत असतात
याला वाटत कोपरा धरावा
चिकटलेला मुखवटा काढून टाकावा
वाटत हा अबोला बस आता कोणीतरी अबोल येऊन शेजारी बसावी
अन् सगळी धडपड तिला सांगावी तिने ती ऐकून घ्यावी
ती मुकी काय बोलेल कोणाला म्हणून याची गुपित गुप्त रहावी
रहस्याचा चेहरा,गंभीर भाव आणि एकटी बसलेली
हिच एकटेपण अन् ही आपल्याच धुंदीत असते
बोलक्या गर्दीत ही एकटीच,असून सुद्धा नसलेली
गर्दीचे नियम सोडून धावायच्या संधीत असते
आणि तिलाही वाटत की कोणीतरी यावं
हिला प्रश्न विचारावा,हिने उत्तर टाकावं
अबोल समजावं हवं तर अन् गुपित समोर आणावं
कोणालातरी दिसण्यापेक्षा असण्याची किंमत असावी
हात धरून हिचा गर्दीतून बाहेर काढण्याची हिम्मत व्हावी
समजुतदार चेहरा आणि नेहमीची उत्तर,तोंडी विषय हाय का भावा हातावर टाळी लगेच पाठीवर थाप
दुसऱ्याची गुपितं जमा करतो हा.थांब म्हणावं आणि तिथेच रहावा सापडणार उत्तर त्याला मर्यादेच माप
हा नेहमी माणसं शोधत असतो,चेहरे सोडवत असतो
सगळे धागे बघत असतात हा होणारा गुंता अडवत बसतो
गुपित मात्र मस्त सांभाळणार,अगदी जशी संचित वही
कोणी जवळ यावं दूर जावं फरक किंचित नाही
भटकलेला चेहरा,खोल गेलेले डोळे,सोबत स्वतःची पावलं
अन् नेहमी पडणारी कोडी
बोटं दाखवून हसणारी आणि प्रश्नांनी गिळायला उठायला
आलेली माणसं आणि राक्षसाची जोडी
याला पण वाटत कोणीतरी यावी
चालणाऱ्या वाटेवर सोबती व्हावी
अर्धी कोडी याने आणि उरलेली तिने सोडवावी
पळाव पळाव अन् ही थकायला व्हावी
मावळता सूर्य बघत क्षणभर विश्रांती म्हणावी
अंधार पडेल याची राक्षस येतील तेव्हा ही मध्ये उभं रहावी
बस उत्तरं हीच आहेत, मुखवटे काढायला हवे
सुंदरतेची परिमाणं आताच तोडायला हवे
समाप्त
तुम्ही वरच्या कोणत्या कडव्यात बसता ते बघा.आणि नंतर बाकीच्या कडव्यात बघा कदाचित तुम्हाला हवं असणार व्यक्तिमत्त्व तिथं असेल😍
9 Comments
छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना
कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई
तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई
फिर क्यूँ संसार की बातों से, भीग गये तेरे नैना
कुछ तो लोग कहेंगे...
हमको जो ताने देते हैं, हम खोए हैं इन रंगरलियों में
हमने उनको भी छुप-छुपके, आते देखा इन गलियों में
ये सच है झूठी बात नहीं, तुम बोलो ये सच है ना
कुछ तो लोग कहेंगे...