कृष्णाकाठ

कृष्णा ,कोयना , प्रीतिसंगम आणि कृष्णाकाठ...
सुरुवात व्हावी माझी तू महाबळेश्वर चा घाट व्हावी
तिथून सोबत असावीस  , तू कृष्णाकाठ व्हावी

मी फिरस्ता व्हावं अन् तू माझी वाट व्हावीस
कृष्णा म्हणून वाहत जावं मी , तू कृष्णाकाठ व्हावीस

मी कधी संथ कधी जलद नेहमीच बदलत
तुझ्यात नेहमीचा संयम
कधी उथळ कधी खोल पण नेहमीच वाहत
अन् तू नेहमीची कायम

सगळं शांत असावं अन् टप्पे पडलेले बघायचे
म्हणून खडे मारावस मला
तुझ्या डोक्यावरून येणाऱ्या सूर्याच्या प्रतिबिंबानी
सुंदर करावंस मला

खडे मारावे तरंग यावा अन् तरंगाची मोठी लाट यावी
थोपवावस मला तू , तू कृष्णाकाठ व्हावी

पावसाची सोबत असावी पात्र मोठं व्हावं
तेव्हा तू लपायला व्हावी
कधी तळ गाठावा मी अन पुढे सरकावं तू
मला जपायला बघावी

नेहमीच असे रंग बदलत असावेत मी
तुझ्यामुळे थोडं स्थिर व्हावं..स्वतःशी गाठ व्हावी
मी वाहतच असावं थोडं अडवावस तू
शांत करावं....तू कृष्णाकाठ व्हावी

आज इथे नी उद्या तिथे
पण नेहमीच अंतर मोजत
बाजूला बघतो तेव्हा ठाम तू
दरवेळीच असते सोबत

मी धुंदीत स्वतःच्या नेहमी तुझ्याकडे पाठ व्हावी
तमा न कशाची सोबत यावी तू , तू कृष्णाकाठ व्हावी

पण वाईट वाटत खांद्यावर तुझ्या माणसं बघून
वाटत तिथे यावं,थोडं बसावं हे सगळं सोडून

वाटतं असही शब्द यावेत दोघांवर
कडवी भरमसाठ व्हावी
मी माझ्या धुंदीत वहावं तू वाहू द्यावं
तू कृष्णाकाठ व्हावी

आणि.........

कोयना बनून दोघात यावं कोणीतरी मधेच
अन् तू बघत बसावस कृष्णाकाठ म्हणून
प्रीतिसंगम समोर दिसावा खरी सुरवात व्हावी माझी
तू तिथेच थांबावस...कृष्णाकाठच कराड बनून

कृष्णा सुरू होते घाटात पण खरी ओळखली जाते कराड वरून.आणि नंतर कोयनेसोबत तशीच पुढे....कराड तसच असत तिथेच असत.कृष्णे ला ओळख मिळवून द्यायचं त्याच काम झालेलं असत... 
कधीकधी आपल्या खूप जवळचा माणूस आपल्याला ओळख देतो आणि नंतर आपली सुरुवात होते.तो तिथेच थांबलेला असतो. आपली वाट बघत.पण परतीचे रस्ते लिहिलेले नसतात आपण पुढे निघून जातो आणि आपली ओळख तीच तशीच राहते जशी कृष्णेची आहे....प्रीतिसंगम कराडची कृष्णा

ओळख राहते पण ओळख देणारी माणसं सहसा लवकर विसरली जात असावीत

Follow for more👉👉shiv4641

#SJ355 hope प्रश्न सुटतील #SO

Post a Comment

12 Comments