वेळ..कधीकधी एखादी व्यक्ती आयुष्यात जवळ नसते तेव्हा त्या व्यक्तीसोबतच्या वेळेला तुम्ही सजवून ठेवलेलं असत.. लहान लहान आठवणी आज आठवाव्या आणि त्या कालपरवाच्या आहेत की काय अस वाटत.दुसऱ्या क्षणात तुम्ही जाग्यावर येता तेव्हा कळत ती व्यक्ती जवळ नाहीये....मग ती कोणीही असेल भाऊ,बहीण,मित्र,आई,वडील,प्रेम
कधीकधी असतात पण अंतर लांब असत आणि कधीकधी ते या जगातच नसतात
त्या सर्वांसाठी एक जागा असतेच नेहमी आणि ती तशीच राहते.....आणि वाटत राहतं तो/ती असायला हवा/हवी होती गाजवलं असत आपण....
हे त्या सर्वांसाठी ज्यांनी आयुष्यात हा असा मला उभा केलाय...तुम्ही deserve करता
I just miss you✋आणि मला पण नेहमी वाटत पलीकडे कुठेतरी तुम्ही पण असाल माझ्यासारखेच वेळ आठवत बसलेले आणि म्हणत असाल "ओंक्या तू असायला हवा होता गाजवलं असत आपण".
तुमच्या आठवणी गडद आहेत
माहितीये मला त्या बाजूला
आहे कोणीतरी ओळखीचा
लांब खूप लांब
माहितीये मला त्या वाटेला
चालतच जातोय तो फिरस्ता
सोडत मैलाचे खांब
आणि जेव्हा शांत रात्र घेरायला येते
आभाळ चंद्रासोबत चांदणं पेरायला घेते
मी आपोआप खिडकीकडे जातो सोबत नसतच कोणी
माझ्यासोबत मीच बसतो शेजारी..अन् हलकं डोळ्यात पाणी
माहितीये मला त्या बाजुला
बदलत असेल कुस कोणी
झोप यावी शांत म्हणून
माहितीये मला पलीकडे
लावत असेल गाणी
प्रशांची सुटावी भ्रांत म्हणून
आणि जेव्हा भिंती घेरायला येतात
छत डोक्यावर येऊन प्रश्न पेरायला घेतात
मी पण हेडफोन टाकून कानात ऐकायला घेतो गाणी
दोन्ही बाजू माझ्याकडे असतात सोबत नसतोच कोणी
पण जाऊदे वाटत कुठेतरी तू पण असशील
अन् असतील आपल्या आठवणी
माहितीये मला त्या बाजूला
कुठेतरी असाच बसलेला तू
मी येईल अन् दात फाडून हसशील
माहितीये मला पलीकडे
एकटाच असून नसलेला तू
मी असायला हवा होतो म्हणत असशील
आणि मला ही वाटत जेव्हा आभाळ घेरायला येतं
ढग दाटून येतात अन आसमंत पाऊस पेरायला घेतं
छत्री सोडून चालायला लागतो मी सोबत नसतंच कोणी
माझ्यासोबत मीच भिजतो...वाहून जात डोळ्यातलं पाणी
पण जाऊदे वाटत कुठेतरी तू पण असशील
अन् असतील आपल्या आठवणी
माहितीये मला तिकडे
शतपावली असेल दररात्री
समस्यांवर पाय आपटत
माहितीये मला डांबरिला
सावलीची होत असेल खात्री
आवासून डोळे फाडत
आणि थंड पडलेला रस्ता जेव्हा घेरायला येतो
चंद्र खिडकीतून आत सावल्या पेरायला घेतो
मी मळकं स्वेटर झटकतो,चालायला घेतो सोबत नसतंच कोणी
माझ्यासोबत मीच चालतो आणि मागे कैलाश खेर ची गाणी
पण जाऊद्या वाटत कुठेतरी तू पण असशील
अन् असतील आपल्या आठवणी
माहितीये मला तिकडे
वेळ होता तेव्हा न ओळखलेला
माणूस असाच बसलाय
माहितीये मला पलीकडे
आता माणूसच नाही वेळेला
व्यक्ती नशिबावर हसलाय
आणि हे सगळं चालू असत आणि भुतं घेरायला येतात
भुतकाळ सांगून जुनं सारं पेरायला घेतात
पण आहेस तू सोबत म्हणून स्वतःला सांगतो मी
चालायला घेतो,पावलं पडतात पण सोबत नसतंच कोणी
पण जाऊद्या वाटतं
कुठेतरी तू पण असशील अन् असतील आपल्या आठवणी
कुठेतरी तू पण असशील अन् असतील आपल्या आठवणी
#Kh14
#PGK39 #batu #IoPE #dost
8 Comments