ध्रुव


कधीकधी स्वतःला खूप वाटतं असत की आपण deserve नाही करत एखाद्याला.आपण त्याला हजारवेळा सांगून थकलो असतो की माझ्यामागे काहीच नाहीये आणि तरीही ती व्यक्ती त्याच ठामपणे उभी असते....सध्या तरी ठाम उभं राहणाऱ्या खूप कमी व्यक्ती आहेत आणि जर त्या तुमच्याजवळ असतील तर ठेवा त्यांना....you deserve more म्हणून लांब जायचं बघू नका....जर त्यांना गमावलत तर अवघड आहे सगळं✋🤞
काय खास आहे तुझ्यात
गिरक्या थांबवून माझ्या शेजारी बसू वाटलं तुला
एवढा बोलका पण नाहीये मी
काय खास आहे तुझ्यात
की माझ्याच फिरक्या घेऊन हसू वाटलं तुला
एवढा हलका पण नाहीये मी

काय खास आहे तुझ्यात
की हल्ली नजरेत पकडून ठेवतेस मला
अवघड जातं ग सुटणं त्यातून
काय खास आहे तुझ्यात
समजुतीच्या वर्तुळात अडकवुन ठेवतेस मला
अवघड जातं तुटणं त्यातून

आणि मी काय केलं ?

तुझ्या नजरेत नको यायला,म्हणून बघणं सोडून दिलं
त्या वर्तुळात नको जायला,म्हणून सांगणं सोडून दिलं

दरवेळी माझ्यामुळे तुला मान खाली घालायला लावली
आणि तरी तू सोबत होतीस माझ्यासोबत
अजून बेकार नको,म्हणून स्वतःची वाट चालायला घेतली
तू तिथेही आलीस माझ्यासोबत

माझ्या बालीश गोष्टी,याची त्याची शपथ
आणि तू तिथे माझ्यासोबत
माझ्या चुका माझा पराभव,गुडघे टेकायची नौबत
आजूबाजू पाहिलं तेव्हा पाठी उभी होतीस तू..माझ्यासोबत

काय खास आहे तुझ्यात
की मला प्रश्न विचारायचा हक्क दिलाय तुला
उत्तर देताना घाबरून जातो मी
काय खास आहे तुझ्यात 
की मला कारणं विचारायचा हक्क दिलाय तुला
संदर्भ सुद्धा सावरून सांगतो मी

काय खास आहे तुझ्यात
की सोबत सोडली नाहीयेस कधी,उभी आहेस शेजारी
तुझ्या ठामपणाला माझी घाबरट सावली बघते
काय खास आहे तुझ्यात 
की एकटेपणाची नौबत आली नाही,दुविधेच्या भर दुपारी
बसलेल्या जाग्यावर तुझ्या,माझी मती आपोआप येऊन बसते

आणि मी काय केलं ?

काहीच नाही ! माझ्यामुळे तुला हरायला लावलं
सर्वात पुढची तू,माझ्यासाठी माग सरायला लावलं

दरवेळी तुला माझ्यासाठी माघार घ्यायला लावली
आणि तरी जिथे मी तिथे तू माझ्यासोबत
किमान तू जिंकाव म्हणून मी अंधारवाट घेतली
आणि तू पण पाठी चालत आलीस माझ्यासोबत

माझ्या बालीश गोष्टी,याची त्याची शपथ
आणि तू तिथे माझ्यासोबत
माझ्या चुका माझा पराभव,गुडघे टेकायची नौबत
आजूबाजू पाहिलं तेव्हा पाठी उभी होतीस तू..माझ्यासोबत

उपकार तुझे,एक संधी माझ्यावर घेतल्याबद्दल
होकार आणि नकाराचा नंदी मध्ये असताना
उपकार तुझे प्रथम ठेवून मौन समजून घेतल्याबद्दल
साऱ्या जगासाठी मी गौण असताना

माझ्या बालीश गोष्टी,याची त्याची शपथ
आणि तू तिथे माझ्यासोबत
माझ्या चुका माझा पराभव,गुडघे टेकायची नौबत
आजूबाजू पाहिलं तेव्हा पाठी उभी होतीस तू..माझ्यासोबत

आजूबाजू पाहिलं तेव्हा पाठी उभी होतीस तू..माझ्यासोबत
आजूबाजू पाहिलं तेव्हा पाठी उभी होतीस तू..माझ्यासोबत


#PDW41 #SJ355 #ध्रुव







Post a Comment

7 Comments

Unknown said…
👌👌👌👌💯💯💯
Sonali Jangam said…
This is precious 😌😿❤❤
Unknown said…
Nice🔥🔥🙏🙏
असली हीरे की चमक नहीं जाती.
अच्छी यादों की कसक नहीं जाती
कुछ दोस्त होते हैं इतने ख़ास कि,
दूर रहने पर भी उनकी महक नहीं जाती।

#हिरे की पहचान हमेशा जौहरी को ही होती हैं..