#Mint369"
ऐक आला तर आवाज ऐक माझा
नसता जा निघून तू,तुझी तुझी ईच्छा
कदाचित असेलच मी चुकीचा,अन् नसत्या अडगळी
कदाचित कचरलो असेल थोडा,थांबायला तुमच्या वेळी
पण उभा होतो दरवेळी त्याच ठरलेल्या जाग्यावर
अन् ह्याचीच शिक्षा आहे आज माझ्या शिरावर
नेहमी थांबणं चुकलं माझं,मी पणा दाखवायची गरज होती
आणि हरवून बसलो मी,शेवटी सावली उभा आणि खरच होती
डोळे सताड उघडे पण झोपलोच आता तर कदाचित
श्वास घट्ट होईल
चालून थकलोय पण गेलोच निघून तर कदाचित
बंद परतीची वाट होईल
हे बघ आधीही बोललोय मी,अजून एकदा नाही जमणार
मी दरवेळी उभा होतो, फुकट दिखावा कशाला करणार
छातीवर वजन नाहीये ,पण भार जाणवतोय कसला रे
रंग उडतो चेहऱ्याचा,तरीही बोलतात “mint काय हसला रे”
कदाचित...कदाचित बोलणं थांबवायला हवं मी.
खरं काय ते कळेल,पण अंधारात नेमकं काय पहावं मी ?
दरवेळी ऐकत आलोय,कधीतरी माझं ऐका रे
हो माहितीये तुमच्या नाही,परिस्थितीच्या चुका रे
मी माझं मीपण सोडून आलो नेहमी इथेच
माझी वेळ आलं कोणी नव्हतं,मी परत तिथेच ||१||
समस्या आणि समस्या
प्रश्न आणि प्रश्न पडलेले तुला
सोडवतो मी,स्वतःच सोडून सगळं बाजूला
लहान आणि लहान
मोठ्या आणि भरगच्च दुविधा तुझ्या
सगळं सोडून येतो,जागच्या जागेवर माझ्या
समजलय तुला सगळं,फक्त तुला वाटतंय तस
एक अक्षर नाही समजलं..आणि हे आहेच अस
कदाचित मीच असेल चुकीचा,माझ्या नसत्या वेळी
पण कचरलो नव्हतो कधी,समजायला तुमच्या अडगळी
उभा होतो दरवेळी, पहिल्या हाकेत दारावर
अन् ह्याचीच शिक्षा आहे आज माझ्या शिरावर
उभा राहणं चुकलं माझं,आधार राहिलो मी
पाय सावरले तुमचे ,माझी वेळ आले तेव्हा भार झालो मी
आधीच बोललोय अजून एकदा नाही जमणार
खरच उभा होतो, फुकट दिखावा कशाला करणार
डोक्यात काय नाहीये,पण माथ्यावर भार जाणवतोय कसला तरी
रंग उडतो चेहऱ्याचा,जेव्हा बोलतात “mint काय हसला रे”
कदाचित...कदाचित बोलणं थांबवायला हवं मी.
खरं काय ते कळेल.पण अंधारात नेमकं काय पहावं मी ?
दरवेळी धावत आलोय,कधीतरी माझ्यासाठी पण या रे
हो माहितीये तुमच्या नाही,परिस्थितीच्या चुका रे
मी माझं सार सोडलं,उभा होतो ठरलेल्या ठिकाणी
माझी वेळ आली,कोणी नव्हतं... भरलेल्या डोळ्यात पाणी
मी माझं मीपण सोडून आलो नेहमी इथेच
माझी वेळ आलं कोणी नव्हतं,मी परत तिथेच ||२||
दरवेळी येणं चुकलं माझं....अपेक्षित राहिलो मी
जेव्हा आवाज दिला आर्ततेने.. दुर्लक्षित झालो मी
#mint369 #Kh14
Prior नाही आता कोणीच, परत तीच चूक नको भावा
पुन्हा व्यक्त व्हायला...mint च्या धुराची भूक नको भावा
भावा हे त्याच्यासाठी जे तू चुकलास priorities.
काल बोललास तू आणि तुझे शब्द मांडण्याचा हा प्रयत्न....तुझ्या दुःखाच भांडवल नाही केलं पण याने हलका होशील...ईच्छा करतो शब्द बरोबर बसतील आणि समस्या जरा तरी कमी होईल....
तुझ्यासाठी तुझ्या समस्या नाही सोडवू शकत पण वाट देऊ शकतो....तुझी गुपितं सुरक्षित आहेत....कळव !
हे तुलाही पाठवू शकलो असतो फक्त पण तुझ्यात सिरियसनेस यानेच येईल😂
तुझ्या तोंडाने तुझ्या शब्दात मांडलय
3 Comments