कधीकधी
थोड्याश्या बालिशपणात जगून घ्यावं
नेमकं होत काय ? स्वतःच बघून घ्यावं
किचकट प्रश्नांची उत्तरं अशीच जगत मिळतात
काही ऐकून, सोडवून काही फक्त बघत मिळतात
जबाबदारी आली म्हणून बदलायला जातो थोडं
गुंता वाढत जातो साध्या प्रश्नांचा, मोठं होतं कोड
खूप शहाणंपण घेऊन बसल की नसतात मिळत उत्तर
थोडं बलिशपण आणलं, किमान मिळतात त्यांची सूत्र
आठवतंय...
लहान असताना असच का ? तसच का ? म्हणत प्रश्नाला प्रतिप्रश्न टाकत बरीच उत्तरं मिळायची
आणि तुला वाटतंय शहाणपण घेऊन प्रश्न सुटतील
आताही तेच करायचंय...
फक्त यावेळी सांगायला कोण येणार नाही
नेमकं काय होतंय बघायला कोण येणार नाही
एकदा सुटायला लागले की भुतं गप बसून जातील
थोड्याश्या बालिशपणात तुझ्या,तुझे सारे हसून घेतील...
एकदा सुटायला लागले की भुतं गप बसून जातील
थोड्याश्या बलिशपणात तुझ्या,तू सुद्धा हसून घेशील...
15 Comments