त्या भिजल्या वाटांवर उभं रहावं तुझ्यासाठी..
अगदी अंतापर्यंत
होकार नकारातला फरक नगण्य होईपर्यंत
असं जीवन जरी आलं
तरी स्वीकार आहे हसत हसत
एकदा तुझ्या नजरेत यावं ओलाचिंब दिसावं बस्स !
त्याच भिजल्या वाटांवर चालायला घ्यावं तुझ्यापाठी.. अनंतापर्यंत
जीवन मरण यातला फरक शून्य होईपर्यंत
मग मरण जरी आलं
तरी स्वीकार आहे हसत हसत..
तू एकदा वळून बघावं फक्त, बघून हसावं बस्स !
त्या भिजल्या वाटेवर बोलायला घ्यावं तुझाशी..अबोला येईपर्यंत
मुका बोलक्यातला फरक शून्य होईपर्यंत
मग मुकं व्हावं लागलं
तरी स्वीकार आहे हसत हसत
तू बोलत रहावं मी ऐकत रहावं बस्स !
त्या भिजल्या वाटेवर भिजायला घ्यावं तुझ्यासोबत...पाऊस जाईपर्यंत
तुझ्या माझ्यातला फरक नगण्य होईपर्यंत
मग तुझं व्हावं लागलं
तरी स्वीकार आहे हसत हसत
एकाच छत्रीखाली रहावं, वाटेल तेव्हा भिजावं बस्स !
4 Comments