पावसात चालणं चांगलं असतं
ती बोलली होती.....
रडणं सोपं जातं केसांवरून ओघळणारं पाणी
आसवं घेऊन जातं असतं, दुःख वाहून नेतं असतं
कुणाला दिसत नाही, कोणी बघून हसत नाही
डोळे बघून कोणी पारख करत बसत नाही
ती बोलली होती
ती बोलली होती कधीतरी खूप अंतर येईल,
कदाचित आज येईल कदाचित नंतर येईल
हे क्षणं निघून जातील, आसवं तसेच राहतील
आठवण आली की तुझ्या मदतीला घनं धावून येतील
तर बाहेर जा, पावसात चालणं चांगलं असतं
ती बोलली होती
रडणं सोपं जाईल केसांवरून ओघळणारं पाणी
आसवं घेऊन जाईल, दुःख वाहून नेईल
ती बोलली होती
सोबत होती ती तेव्हा रडणं काही झालं नाही
आज लाख बरसला पाऊस रडू मात्र आलं नाही
#regrets #Shivonkarr
5 Comments