क्षितिजापार

शांत पावसात उभी, चिंब तू 
वेंधळी, वेडी तरी रंभेचं प्रतिबिंब तू 
उभा मी ही, बराच लांब तरी
संथ पावसात, विजेच्या खांबाशेजारी

आता दर पावसात जीव जातो 
अर्धा तू घेतेस,अर्धा मी विजेला देतो
पाउस थांबतो, जीवात जीव येतो
अर्धा तू देतेस, अर्धा भास्कर उधार देतो

जगणं म्हणून काय आता
तू एकच कारण आहेस
तुला कमावल तरी, तुला गमावल तरी
अंती फक्त मरण आहे

हे अस कितीवेळ अजून
आज मी पुन्हा परत विचारतो 
नाहीत मिळत उत्तरं म्हणून
तुझ्यामागे चालायला घेतो

#फ्रॉम_प्रthmeश_chem
२८/०६/२०१९

Post a Comment

5 Comments