स्वतःकडे पाहणारी की स्वतःपलीकडे नेणारी
कळावी प्रश्नं आज, उद्याच्या वर्गा साठी
झिजवतो देह उभा प्रिये तुझ्या स्वर्गा साठी
उत्तरं तरी कशी असावी, कशी दिसावी
तुझ्याकडे जाणारी की तुझ्यापलीकडे पाहणारी
कळावी उत्तरं आज, उद्याच्या परीक्षांसाठी
झिजवतो देह उभा प्रिये तुझ्या लक्षां साठी
वाट तरी कशी असावी, कशी दिसावी
ठिकाणाला जाणारी की क्षितिजापलीकडे पाहणारी
कळावी वाट आज, उद्याच्या प्रवासासाठी
झिजवतो देह उभा प्रिये तुझ्या सहवासासाठी
अंत तरी काय असावा, कसा दिसावा,
अंताला जाऊन की अंतापलीकडे पाहून
कळावा अंत आज, उद्याच्या तयारी साठी
झिजवतो देह उभा प्रिये तुझ्या पायरी साठी.....
झिजवतो देह उभा प्रिये तुझ्या पायरी साठी
4 Comments