भीती आहे चुकून नजरेत यायची
भीती आहे तिच्याशी नजर मिळवायची
डोळे बंद करावे तरी व्यर्थ
भीती आहे ती समोर असता नजरेपार निघून जायची
ही भीती डोळे उघडे ठेवू देणार नाही, बंदही करू देणार नाही
तेव्हढ्यात ती समोर येणार, डोळ्यांकडे बघणार
उरलीसुरली ताकत पण तिथंच निघून जाणार,
मी डोळे बंद करून बसावं का ?
आणि ती जवळ येऊन दूर निघून गेली तर ?
मग मी तिच्या डोळ्यांकडे तरी बघाव का ?
आणि मनातलं सगळं तिला कळून आलं तर ?
सगळं सांगून पण ती कोड्यात रहायची भीती आहे
न सांगता तिला सगळं कळून यायची भीती आहे
विश्वास जमवून बोलायला जावं तरी व्यर्थ
तिला कायमचंच गमावून बसायची भीती आहे
#regrets #Nb4O1Si
4 Comments
भीती आहे स्वताला परत स्वताच्याच नजरेत पाडायची.