बोलत चल रे....

भावा कधी काही वाटलं तर बोलून टाकत चल
जर down आहेस तर आता खांद्यावर डोकं ठेवून रड...

कारण मी आता खांदा ओला करून घेईल,बसेल तुझ्यासोबतच जितक्या वेळ वाटेल तुला
पण आता गप राहशील,आणि तुला समोर हसताना पाहिलेला मी,खांदा द्यायला नाय जमायचं रे मला

जड झालेलं साठवत जाशील,माझ्यासमोर हसत येशील
जून झालेलं आठवत राहशील,बजबजपुरीत फसलेलं पाहशील

युद्ध चालू आहे माहितीये,पण तू सांगत नाही तोवर मीही काही नाही करू शकत
खरा चेहरा आणतच नाहीस तू,आणि हा मुखवटा मी नाही ओळखू शकत 

ओळखायला काय रे,जवळून ओळखतो तुला 
मग हक्काचं समज आणि बोलून टाक एकदाच
अरे प्रॉब्लम create करून solve केलेत ना आपण
या वेळी पण बोल आणि याला कोलून टाक एकदाच

तुला वाटेल तू एकटा सोडवशील सर्व,आणि सांभाळशील 
मध्ये येऊन थांबशील कुठेतरी,आणि गुदमरशील

म्हणून बोलत जाउ रे आपण,मुखवटा काढून हसत जाऊ
व्यक्त होत राहू,साला तुला रडवणाऱ्या जगाची ठासत राहू

म्हणून कधी काहीही वाटलं ना तरी बोलून टाकत चल
Down वाटत असेल तर खांद्यावर डोकं ठेवून रड..

कारण आता मी आता खांदा ओला करून घेईल,बसेल तुझ्यासोबतच जितक्या वेळ वाटेल तुला
पण आता गप राहशील, आणि तुला समोर हसताना पाहिलेला मी,खांदा द्यायला नाय जमायचं रे मला.......


#missyou_sushant_singh_rajput
#भावा_मी_आहे...
#ब्रो_is_emoशन
#mental_health
@Shiv4641






Post a Comment

21 Comments

Unknown said…
अतिशय सुंदर लेख
Unknown said…
Always bhawa tu assil ....and saddhya chya youth brobr honara khup motha ani challenging prob ahe ha
shivonkar said…
धन्यवाद 😐
भावा, तु असच लिहीत चल रे..
तु लिहलेलं वाचताना down झालेलं मुड up झाल्यासारखं वाटतं..
त्यामुळे तु लिहीत चल रे..
shivonkar said…
नक्की😊
Unknown said…
Khuuuupp mast bhawa.. Asch positive vichar jagnyala navin positive drushtikon detat...
Vallabh said…
Mst lihilay bhava

👌👌👌
Unknown said…
ही न्यूज ऐकून काही बोलावस वाटतच न्हवत कारण एकच की माणसाला जगायला पाहिजे तरी काय,
तीच ती संपत्ती की प्रेमळ संप्रेषण?
कोणीतरी तरी उगाचच बोलून नाही गेलंय, माणसाने आपल्या विचारांची देवाघेवाण ठेवावी.. परत एकच विनंती

घट्ट मिठी मारून रडा पण व्यक्त व्हा...



NIHAL SAYYAD said…
Mind-blowing as always 😍😘
Unknown said…
मस्त रे 🤗
Unknown said…
Khupach Chan yar onkar...👌
shivonkar said…
धन्यवाद😊
shivonkar said…
हो व्यक्त होणं महत्वाचं
shivonkar said…
धन्यवाद😊
shivonkar said…
धन्यवाद 😊
Unknown said…
Fantastic blog bhava
shivonkar said…
धन्यवाद 😊
Ekant gunjawate said…
आत्ताच्या परिस्तिथी बघून हा लेख खरच हृदयाला भिडणारा आहे भावा !!!! .....लिहीत चल मस्त लिहितोयस 👍👍👌👌💐
shivonkar said…
धन्यवाद भावा