भावा कधी काही वाटलं तर बोलून टाकत चल
जर down आहेस तर आता खांद्यावर डोकं ठेवून रड...
कारण मी आता खांदा ओला करून घेईल,बसेल तुझ्यासोबतच जितक्या वेळ वाटेल तुला
पण आता गप राहशील,आणि तुला समोर हसताना पाहिलेला मी,खांदा द्यायला नाय जमायचं रे मला
जड झालेलं साठवत जाशील,माझ्यासमोर हसत येशील
जून झालेलं आठवत राहशील,बजबजपुरीत फसलेलं पाहशील
युद्ध चालू आहे माहितीये,पण तू सांगत नाही तोवर मीही काही नाही करू शकत
खरा चेहरा आणतच नाहीस तू,आणि हा मुखवटा मी नाही ओळखू शकत
ओळखायला काय रे,जवळून ओळखतो तुला
मग हक्काचं समज आणि बोलून टाक एकदाच
अरे प्रॉब्लम create करून solve केलेत ना आपण
या वेळी पण बोल आणि याला कोलून टाक एकदाच
तुला वाटेल तू एकटा सोडवशील सर्व,आणि सांभाळशील
मध्ये येऊन थांबशील कुठेतरी,आणि गुदमरशील
म्हणून बोलत जाउ रे आपण,मुखवटा काढून हसत जाऊ
व्यक्त होत राहू,साला तुला रडवणाऱ्या जगाची ठासत राहू
म्हणून कधी काहीही वाटलं ना तरी बोलून टाकत चल
Down वाटत असेल तर खांद्यावर डोकं ठेवून रड..
कारण आता मी आता खांदा ओला करून घेईल,बसेल तुझ्यासोबतच जितक्या वेळ वाटेल तुला
पण आता गप राहशील, आणि तुला समोर हसताना पाहिलेला मी,खांदा द्यायला नाय जमायचं रे मला.......
#missyou_sushant_singh_rajput
#भावा_मी_आहे...
#ब्रो_is_emoशन
#mental_health
@Shiv4641
21 Comments
तु लिहलेलं वाचताना down झालेलं मुड up झाल्यासारखं वाटतं..
त्यामुळे तु लिहीत चल रे..
👌👌👌
तीच ती संपत्ती की प्रेमळ संप्रेषण?
कोणीतरी तरी उगाचच बोलून नाही गेलंय, माणसाने आपल्या विचारांची देवाघेवाण ठेवावी.. परत एकच विनंती
घट्ट मिठी मारून रडा पण व्यक्त व्हा...