त्रिकुट

एकाच विनोदावर बेफाम बालिश हसणं ते एकाची लागल्यावर न विचारता एकाजागी जमा असणं
कारण भेटल्यावर दोघांनी मिळून एकाची उतरवणे ते भावा वहिनी कशा रे म्हणत हरभऱ्यावर चढवणे
बोलत बोलत दोघांनी तिसऱ्याची चांगली काढणे ते एकमेकांसाठी एकत्र मिळून नडने
दोघेच असल्यावर तिसऱ्याची वाटणारी उणीव ते आता कोणाची इज्जत काढायची ही झालेली जाणीव
दोस्तीत व्यवहार नाही म्हणत फोनपे कर म्हणणे ते lecture नंतर एकत्रच बाहेर जाणे
एक धाकड,एक डोकेबाज,तिसरा दोघांपासून बेजार...स्वतःची झंड जिंदगी माहीत असून दुनिया बदलायचे विचार


तिघा जणांची दोस्ती म्हणजे कुत्र्याची शेपटी असते
वाकडी असुद्या पण ती किमान शेवटपर्यंत तशीच असते
स्वतःमधला फरक त्यांनी त्रिकुटा बाहेरच टांगला असतो
सोबत असली तर त्यांच्यासाठी नरक सुद्धा चांगला असतो

भावा तूला जे तेच मला म्हणत एकच खाणार,समस्या सोडवण्यासाठी तयार करून तिघे पण जाणार
भावा शर्ट भारी रे म्हणत घालायला मागणार, नाही तर ऐकून घेणारे नाहीत पुढच्याच दिवशी घालणार
शेवटच्या क्षणी point समजावून शिक्षक बनतील,नंतर आला मोठा शाना म्हणत औकातीवर आणतील
उलट्या खोपडी प्रत्येकात वेगवेगळे किडे आहेत,भावा तुझ्यासाठी म्हणत बोलाल तिथे खडे आहेत
सोबत असुद्या मैलाचे रस्ते सुद्धा जवळ वाटतात.बोलत,हसत एकमेकांची जिरवत ते आरामात कटतात
तीन तिगाडा काम बिगाडा म्हणणारे आपण ते आज सर्वांचे आपापले त्रिकुट आहेत
झालंच काही एकाला कमीजास्त तर पुढच्या मिनिटाला प्रकट आहेत

तिघा जणांची दोस्ती मागितली की आगीची रेसिपी भेटते
दोघे असून मज्जा नाही तिघे आल्यास म्हणावी तशी पेटते
त्या सर्व तिघांसाठी कधी न संपेल एवढ लिखाण आहे
एकत्र असल्यास नरक सुद्धा थंड हवेच ठिकाण आहे
तिघांसाठी न संपेल एवढं लिखाण आहे
यांच्यासाठी नरक सुद्धा थंड हवेच ठिकाण आहे

#त्रिकुट

visit my blog  and follow👇👇👇


Post a Comment

11 Comments

Unknown said…
Right😇👍🤝
Sonali Jangam said…
Trios hits different 💪🏻😻😻💕.....
Athu 435 said…
❤️❤️❤️kdk
"तीन तीगाड काम बिगाड" ही म्हण बहुतेक याच त्रिकुटावरून पडली असेल.. 😜 पण आयुष्यात त्रिकूटाशिवाय मज्जा नाही..
बहोत बढिया शेठ, नेहमीप्रमाणे खूप छान Injured केलात वाचकांना
shivonkar said…
😂😂बिघाड करून सोडवण्यात मज्जाच वेगळी
Ekant gunjawate said…
भाई बघितलं आहे हे सर्व अस म्हणण्या पेक्षा जगलोय मी सर्व !!!!!! ... हे सर्व शब्दात मांडल तू त्यासाठी धन्यवाद ☺️☺️☺️